एकूण कोरोनाबाधिताचा आकडा १४६४ वर
प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेदिवस वाढत असून सध्या प्रशासकीय यंत्रणाही सध्या चांगलीच कामाला लागली आहे. प्रशासनाने वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक कोरोनाच्या बाबतीत गंभीर झालेले नाहीत हे वाढत असलेल्या रूग्णांवरून दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात दुचाकी बंदीचे आदेश दिले असले तरीही शहरातील नागरिक या आदेशाला न जुमानता दिवसभर दुचाकीवरून शहरात फेरफटका मारताना दिसत आहेत यामुळेच शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून दि. 2 ऑगस्ट रोजी उस्मानाबादमध्ये 54, उमरगा येथे 63, तुळजापूर 44, कळंब 3, परंड्यात 6 , लोहारा 3, भूम 0 व वाशीत 1 असे एकूण 174 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या 1464 वर पोहचली असून उपचारानंतर बरे होवून घरी गेलेले रुग्ण 516 आहेत. 891 रुग्ण उपचार घेत आहेत तर 57 बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत 513 स्वॅबचे नमुने चाचणीसाठी औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व उस्मानाबादेतील विद्यापीठ उपकेंद्रात पाठवीणेत आले होते. त्यानुसार 478 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 174 पॉझिटिव्ह, 260 निगेटिव्ह, 44 इनक्न्वलुजीव, 35 जणांचे अहवाल प्रलंबीत आहे. तर अॅन्टी रॅपीड टेस्ट मध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. त्यामुळे रुग्णाची संख्या 1464 वर पोहंचली आहे. सदर अहवाल रविवार (दि. 2 ) दुपारी 1.58 वाजणेच्या सुमारास प्राप्त झाला. त्यामुळे उस्मानाबाद मध्ये एकच खळबळ उडाली आहे .