प्रतिनिधी / उस्मानाबाद
जिल्ह्याचा स्वॅब घेतलेल्यांचे कोरोना रिपोर्ट् आज प्राप्त झाले. त्यात ७ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यात भूम तालुक्यातील सहा, तर कळंब तालुक्यातील एकाचा समावेश आहे.
दि. 1 जुलै रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे व 187 स्वॅब नमुने वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी 119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून खालीलप्रमाणे आहेत.
07 पॉजिटीव्ह
02 rejected
10 अनिर्णित
100 नेगेटिव्ह
138 पेंडिंग
पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती
भूम तालुका -06
27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम.
22 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम.
कळंब तालुका 01
31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब.
आज सकाळी 9.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 385 इतकी आहे.