कॅमेरुन ग्रीचची फटकेबाजी, यजमान ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला 388 धावांचे आव्हान
सिडनी / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा शनिवारी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरील कसोटी सामन्यात दोन्ही डावात शतके झळकावणारा इतिहासातील तिसरा फलंदाज ठरला. ख्वाजा याशिवाय एकाच ऍशेस कसोटीत दोन शतके झळकावणारा सहावा ऑस्ट्रेलियन देखील ठरला. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध 388 धावांचे आव्हान ठेवले. शनिवारी चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद 30 धावांची मजल मारली.
या लढतीतील पहिल्या डावात 137 धावांचे योगदान देणाऱया उस्मान ख्वाजाने दुसऱया डावात 138 चेंडूत नाबाद 101 धावा जमवल्या. त्याच्या खेळीत 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. ऑस्ट्रेलियाच्या या दुसऱया डावात कॅमेरुन ग्रीनची फटकेबाजी लक्षवेधी ठरली. त्याने 122 चेंडूत 7 चौकार व एका षटकारासह 74 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव 68.5 षटकात 6 बाद 265 धावांवर घोषित केला आणि इंग्लंडला चौथ्या डावात 388 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडतर्फे जॅक लीचने 21.5 षटकात 84 धावात 4 बळी घेतले तर मार्क वूडने 15 षटकात 65 धावात 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
शनिवारी ऑस्ट्रेलियाने तिसऱया सत्रात 4 बाद 149 या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केली. ख्वाजा व ग्रीन यांची पाचव्या गडय़ासाठी साकारलेली 179 धावांची भागीदारी विशेष महत्त्वाची ठरली. ख्वाजासाठी हे 4 कसोटी सामन्यातील दुसरे शतक होते. अखेर जॅक लीचने ग्रीनला बाद करत ही जोडी फोडल्यानंतर इंग्लंडला दिलासा मिळाला. ग्रीन बाद झाल्यानंतर पुढील चेंडूवरच ऍलेक्स कॅरेही बदली खेळाडू पोपकडे झेल देत तंबूत परतला. येथेच ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव जाहीर केला.
इंग्लंडची सावध सुरुवात
विजयासाठी 388 धावांचा पाठलाग करताना इंग्लिश सलामीवीरांनी बिनबाद 30 अशी सावध सुरुवात केली. शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी झॅक क्रॉली 32 चेंडूत 3 चौकारांसह 22 तर हसीब हमीद 34 चेंडूत 8 धावांवर नाबाद राहिले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव ः 8 बाद 416 (घोषित).
इंग्लंड पहिला डाव ः सर्वबाद 294.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव ः मार्कस हॅरिस झे. बदली खेळाडू (पोप), गो. लीच 27 (61 चेंडूत 3 चौकार), डेव्हिड वॉर्नर झे. बदली खेळाडू (पोप), गो. वूड 3 (18 चेंडू), लाबुशाने झे. बदली खेळाडू (पोप), गो. वूड 29 (42 चेंडूत 1 चौकार), स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. लीच 23 (31 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), उस्मान ख्वाजा नाबाद 101 (138 चेंडूत 10 चौकार, 2 षटकार), कॅमेरुन ग्रीन झे. रुट, गो. लीच 74 (122 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), ऍलेक्स कॅरे झे. बदली खेळाडू (पोप), गो. लीच 0 (1 चेंडू). अवांतर 8. एकूण 68.5 षटकात 6 बाद 265 (घोषित).
गडी बाद होण्याचा क्रम
1-12 (वॉर्नर, 5.6), 2-52 (हॅरिस, 18.1), 3-68 (लाबुशाने, 21.4), 4-86 (स्मिथ, 28.6), 5-265 (ग्रीन, 68.4), 6-265 (कॅरे, 68.5).
गोलंदाजी
अँडरसन 12-1-34-0, ब्रॉड 11-3-31-0, मार्क वूड 15-0-65-2, लीच 21.5-1-84-4, रुट 7-0-35-0, मलान 2-0-13-0.
इंग्लंड दुसरा डाव (टार्गेट 388) ः झॅक क्रॉली खेळत आहे 22 (32 चेंडूत 3 चौकार), हसीब हमीद खेळत आहे 8 (34 चेंडू). अवांतर 0. एकूण 11 षटकात बिनबाद 30.
गडी बाद होण्याचा क्रम
स्टार्क 4-0-10-0, पॅट कमिन्स 4-0-15-0, स्कॉट बोलँड 3-1-5-0.
कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतके झळकावणारे ऑस्ट्रेलियन फलंदाज
फलंदाज / पहिला डाव / दुसरा डाव / प्रतिस्पर्धी / ठिकाण / सामन्याची तारीख
वॉरन बर्डस्ले / 136 / 130 / इंग्लंड / द ओव्हल / 9 ऑगस्ट 1909
ऑर्थर मॉरिस / 122 / 124* / इंग्लंड / ऍडलेड / 31 ऑगस्ट 1947
डॉन ब्रॅडमन / 132 / 127* / भारत / मेलबर्न / 1 जानेवारी 1948
जॅक मोरोनी / 118 / 101* / द. आफ्रिका / जोहान्सबर्ग / 10 फेब्रुवारी 1950
बॉब सिम्पसन / 153 / 115 / पाकिस्तान / कराची / 24 ऑक्टोबर 1964
डग वॉल्टर्स / 242 / 103 / विंडीज / सिडनी / 14 फेब्रुवारी 1969
गेग चॅपेल / 247* / 133 / न्यूझीलंड / वेलिंग्टन / 1 मार्च 1974
इयान चॅपेल / 145 / 121 / न्यूझीलंड / वेलिंग्टन / 1 मार्च 1974
ग्रेग चॅपेल / 123 / 109* / विंडीज / ब्रिस्बेन / 28 नोव्हेंबर 1975
ऍलन बोर्डर / 150* / 153 / पाकिस्तान / लाहोर / 18 मार्च 1980
ऍलन बोर्डर / 140 / 114* / न्यूझीलंड / ख्राईस्टचर्च / 28 फेब्रुवारी 1986
डीन जोन्स / 116 / 121* / पाकिस्तान / ऍडलेड / 19 जानेवारी 1990
स्टीव्ह वॉ / 108 / 116 / इंग्लंड / मँचेस्टर / 3 जुलै 1997
मॅथ्यू हेडन / 197 / 103 / इंग्लंड / ब्रिस्बेन / 7 नोव्हेंबर 2002
मॅथ्यू हेडन / 117 / 132 / श्रीलंका / केर्न्स / 9 जुलै 2004
रिकी पाँटिंग / 149 / 104* / विंडीज / ब्रिस्बेन / 3 नोव्हेंबर 2005
रिकी पाँटिंग / 120 / 143* / द. आफ्रिका / सिडनी / 2 जानेवारी 2006
रिकी पाँटिंग / 103 / 116 / द. आफ्रिका / दरबान / 24 मार्च 2006
फिल हय़ुजेस / 115 / 160 / द. आफ्रिका / दरबान / 6 मार्च 2009
डेव्हिड वॉर्नर / 135 / 145 / द. आफ्रिका / केपटाऊन / 1 मार्च 2014
डेव्हिड वॉर्नर / 145 / 102 / भारत / ऍडलेड / 9 डिसेंबर 2014
डेव्हिड वॉर्नर / 163 / 116 / न्यूझीलंड / ब्रिस्बेन / 5 नोव्हेंबर 2015
स्टीव्ह स्मिथ / 144 / 142 / इंग्लंड / बर्मिंगहम / 1 ऑगस्ट 2019
उस्मान ख्वाजा / 137 / 101* / इंग्लंड / सिडनी / 5 जानेवारी 2022