पणजी प्रतिनिधी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत घेतलेल्या बैठकीत सांगे येथील उस उत्पादक शेतकऱयांचे उस कापणी संबंधित विषय आणि साखर कारखान्याचे पुनरूज्जीवन करणे यासंबंधीच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यानी राज्य सरकारने संजीवनी सहकारी साखर कारखान्यासाठी उस शेतकऱयांची सुविधा समितीची स्थापना केल्याची माहिती दिली. या समितीचे अध्यक्ष माजी खासदार अड. नरेंद्र सावईकर आहेत. साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासंबधी विविध विषय समितीतर्फे हाताळण्यात येतील.
3 नोव्हेंबर रोजी सदर समितीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येईल. या बैठकीत समितीच्या पुढील कृतीसंबधी चर्चा करण्यात येईल.