वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतातील ऊर्जा वापरामध्ये 2.2 टक्के इतकी अल्पशी वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 105.54 अब्ज युनिट विजेचा वापर करण्यात आला आहे.
तिसऱया कोरोना लाटेमुळे काही ठिकाणी निर्बंध लादले असल्याने विजेच्या वापरात म्हणावी तशी वाढ दिसली नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये 103.25 अब्ज युनिट विजेचा वापर करण्यात आला होता. त्याच्या मागच्या वर्षी समान महिन्यात इतकीच ऊर्जा वापरली गेली होती. ऊर्जा मंत्रालयाकडून या संबंधातील माहिती देण्यात आली आहे.
193.64 जीडब्ल्यू इतकी सर्वाधिक ऊर्जा एकाच दिवशी मागच्या महिन्यामध्ये वापरली गेल्याचे दिसून आले आहे. स्थानिक निर्बंधाच्या कारणास्तव विविध राज्यामध्ये उर्जेचा वापर घटला.