ऍलन मस्कच्या रॉकेटद्वारे होणार प्रक्षेपण
तुमच्या घराची खिडकी किंवा दरवाजा खुला तर राहिला नाही ना याची माहिती आता अंतराळात बसूनही मिळविता येणार आहे. घरांमधून उत्सर्जित होणाऱया ऊर्जेच्या अचूक आकलनाद्वारे हे शक्य होणार आहे. ब्रिटनचे सरकार एक हीट सेंसिग उपग्रह तयार करून तो प्रक्षेपित करण्याची तयारी करत आहे. हाय डेफिनेशन इन्फ्रारेड रेडिएशन डिटेक्टरांद्वारे ऊर्जा उत्सर्जनाचे अचूक आकलन करता येईल या दृष्टीने हा उपग्रह तयार करण्यात येत आहे.
अंतराळ कंपनी सॅटेलाइट वीयूचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँथनी बेकर यांनी या उपग्रहात युनिक इन्फ्रा रेड कॅमेरा बसविण्यात आल्याचे सांगितले. या कॅमेऱयाच्या मदतीने कुठल्याही घरातून उत्सर्जित होणाऱया ऊर्जेची अचूक गणना केली जाऊ शकते. ग्रीन हाउस गॅसेसचे उत्सर्जन शून्यापर्यंत नेणे सर्वात कठिण काम राहिले आहे. घरी, कार्यालये आणि कारखान्यांमधून ऊर्जेचे उत्सर्जन अत्यंत वेगाने होत असताना हे अधिकच कठिण ठरले असल्याचे ते म्हणाले.
वीज बिलात होणार बचत
या उपग्रहाच्या मदतीने स्वतःची कंपनी, सरकारी उपक्रमांना येणारे विजेचे बिल कमी करता येणार आहे. कंपनीकडून हा उपग्रह गिल्डफोर्ड शहरात 7 थर्मल इमेजिंग पडताळणीनंतर तयार करण्यात येतोय. हा उपग्रह जागतिक तापमानवाढीशी लढण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुढील वर्षापर्यंत हा उपग्रह फाल्कन-9 रॉकेटद्वारे ऍलन मस्कची कंपनी स्पेस-एक्सकडून प्रक्षेपित केला जाणार आहे. या उपग्रहाच्या हिस्स्यांची निर्मिती ब्रिटनच्या कार्नवाल, स्टेटलँड, उत्तर स्कॉटलंडमध्ये केली जात असल्याचे सॅटेलाइट वीयूकडून सांगण्यात आले.
आग, भूस्खलनाच्या नुकसानीचा अनुमान
या मोहिमेसाठी ब्रिटिश अंतराळ संस्था 200 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करत आहे. या उपग्रहाद्रे 2 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची अचूक गणना होऊ शकेल. याच्या मदतीने नैसर्गिक आपत्तींमधील नुकसानीचा योग्य अनुमान लावता येणार आहे.