हुवाडी / प्रतिनिधी
मलकापूर – कोकरूड रस्त्यावर उभा असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला धडकून पेरीड तालुका शाहुवाडी येथील युवक पृथ्वीराज उर्फ पप्पू संजय पाटील वय २५) हा युवक गंभीर जखमी झाला होता. सी पी.आर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मुत्यू झाला . याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. सदर अपघात बुधवारी रात्री घडला.
मिळालेल्या माहीती नुसार बुधवारी रात्री पृथ्वीराज पाटील मलकापूरला आपल्या मोटार सायकल वरून कामासाठी गेला होता . काम आटोपून परत मलकापूर – कोकरूड रस्त्यावरून घरी जात असताना भर पावसात ऊसाच्या ट्रॉलीला धडकून तो’गंभीर जखमी झाला. अपघाताची बातमी समजताच ग्रामस्थांनी त्यांना तातडीने सी पी आर रुग्णालयात दाखल केले. त्याच्या वर उपचार सुरु असताना त्याची प्राणज्योत मालवली . पृथ्वीराज हा मनमिळावू स्वाभावाचा होता . गावात त्याचा मित्र परिवार मोठा होता. त्याच्या अशा अचानक जाण्याने पेरीड गावावर शोककळा पसरली आहे . त्याच्या पाश्चात आई, वडील, बहिण, पत्नी, दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे .