लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीला पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सोमवारी मोठय़ा प्रमाणात ऊस, अंबोती, केळीची झाडे आणि झेंडूंच्या फुलांची विक्री झाली. शहरासह शहराबाहेरील विविध रस्त्यांवरदेखील विक्रीसाठी या साहित्याची आवक वाढली होती. किराणा दुकानदार आणि इतर विपेत्यांकडून उसाची आणि केळींची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाली.
शहरातील नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस रोड, आंबेडकर रोड, बेळगाव-वेंगुर्ला रोड, विनायक मंदिर, आरपीडी क्रॉस, सम्राट अशोक चौक आदी ठिकाणी विपेते या साहित्यासह पहाटेच दाखल झाले होते. कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठय़ा उत्साहात साजरी होत आहे. त्यामुळे पूजेच्या साहित्याला मागणी वाढली होती. लक्ष्मी पूजनच्या पार्श्वभूमीवर सोमवारी ऊस, अंबोती, केळी आणि झेंडूंच्या फुलांच्या विक्रीतून मोठी उलाढाल झाली.
दिवाळीत किराणा दुकानदार, दूध संस्था आणि इतर संस्थांतून लक्ष्मी पूजन केले जाते. त्यामुळे ऊस, अंबोती, झेंडूचे फुले यांना विशेष मागणी असते. त्यामुळे सोमवारी या साहित्याला मागणी वाढली होती. बाळेकुंद्री, मुतगा येथून शेतकरी ऊस घेऊन दाखल झाले होते. त्यामुळे शहरात मोक्याच्या ठिकाणी या साहित्याची आवक वाढली होती. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्याचे पाहायला मिळाले.