पाच हजारपासुन सुरुवात, कारखाना व्यवस्थापनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
वार्ताहर / कुंभोज
कुंभोज ता. हातकणंगले व परिसरात सध्या जवळजवळ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दहा सहकारी साखर कारखान्यांच्या व काही प्रमाणात खाजगी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या व ऊस तोडणी मशिन दाखल झाले असून, गेल्या महिन्याभरापासून ऊस तोडणीला मोठा जोर आला आहे.
पण सध्या कुंभोज परिसरात नामांकित असणारे कारखान्यांच्या ऊस तोडणी टोळ्या जोर धरत आहेत परिणामी काही कारखान्यांच्या तोडणी मशीन देखील दाखल झाले असून, ऊस तोडणी मजुरांच्या व ऊस तोडणी मशीनच्या असणाऱ्या ऊस तोडीच्या भल्या मोठ्या आर्थिक रकमेच्या मागणीमुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. परिणामी ऊस तोडणी टोळ्या एक एकर ऊस तोडण्यासाठी कमीत कमी चार ते पाच हजार रुपये घेत असून, ऊस तोडणी मशीन तीन ते चार हजार रुपये घेत असल्याचे चित्र दिसत आहे. सदर ऊस तोडणी मंजूर व मशीन वाल्यांच्या आर्थिक मागणीला सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात कंटाळला असून एकंदरीत निसर्गात होणारे वारंवार बदल, त्यातून पिकाची हानी शेतकऱ्याचे होणारे हाल व शेवटच्या टप्प्यात ऊस पाठवताना ऊस तोडणी मजुरांचा ऊस तोडिसाठी असणारा अथिक हेकेखोरपणा, व याकडे कारखाना व्यवस्थापनाचे असणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे.
पण प्रत्येकवेळी शेतकरी सभासद आपले म्हणणे कारखाना व्यवस्थापनासमोर वारंवार मांडत आहे. परिणामी सर्वच कारखान्याचे तोडणी व्यवस्थापन यावर्षी मोठ्या प्रमाणात कोलमडले असून, प्रत्येक कारखान्याचे संचालक व व्यवस्थापन सदर आर्थिक मागणीच्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी एक ट्रॅक्टर खेपे साठी ऊस तोडणी मजुरांना पाचशे रुपये व ड्रायव्हरला दोनशे रुपये एंट्री द्यावी लागत असून, सदर पैसे देत असताना शेतकऱ्यांची मोठी अथिक समस्या निर्माण होत आहेत.
परिणामी सर्व खर्च पाहता प्रत्येक शेतकऱ्याला एकरा पाच ते सहा हजार रुपये खर्च येत असून हा खर्च कशातून भरून काढायचा ही समस्या शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. पण वाढत जाणारे खतांचे दर, शेती मशागतीसाठी आवश्यक असणारी खर्चिक सामग्री, लाईट बिल, मशागतीसाठी आवश्यक असणारे साहित्य व शेवटी ऊस घालवण्यासाठी मंजुराना द्यावे लागणारे पैसे, यामुळे शेतकऱ्यांच्या हातात शेवटी राबनुकच राहत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी सदर आर्थिक व्यवहाराचे प्रस्त कुंभोज व परिसरात सध्या वाढले असून यामध्ये कारखाना व्यवस्थापनाने लक्ष घालून व तोडणी मंजूर व ऊस तोडणी मशीन यांच्यावर नियत्रणं करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी कारखाना व्यवस्थापनाचे अधिकारी सदर मजुरांना पैसे देण्यासाठी शेतकऱ्याला भाग पडत असून त्यामुळे सभासद वर्गात कारखाना व्यवस्थापनाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.