ट्रॅक्टर पुलावरुन उलटून बोगुर जवळ सात ठार
प्रतिनिधी / बेळगाव
ऊस तोडणी कामगारांना घेऊन येणारा ट्रॅक्टर पूलावरुन उलटून सात कामगार ठार झाले आहेत. बोगूर (ता. खानापूर) जवळ शनिवारी सकाळी ही घटना घडली असून 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघातात चौघे जण जागीच ठार झाले असून इस्पितळाला हलविताना तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.