साखर कारखान्यांच्या बैठकीत सरकारची सूचना – अन्यथा शिस्तभंगाची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
अनेक साखर कारखान्यांनी 2020-21 या वर्षातील शेतकऱयांची ऊसबिले थकविल्याचे निदर्शनास आले असून वस्त्राsद्योग, ऊस विकास आणि साखरमंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांनी साखर कारखान्यांनी ही बिले दोन दिवसांत (3 ऑक्टोबर) शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
साखरमंत्री शंकर पाटील मुनेनकोप्प यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बेंगळुरात राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक/मुख्य कार्यनिर्वाहक अधिकाऱयांची बैठक पार पडली. यावेळी 2020-21 या हंगामातील आणि मागील थकित ऊसबिले देण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. 2020-21 या आर्थिक वर्षातील ऊस बिलांच्या थकबाकी वसुलीसाठी अलिकडेच बसवेश्वर शुगर्स-कारजोळ, जि. विजापूर आणि कोअर ग्रीन शुगर्स-शहपूर, जि. यादगीर या दोन्ही कारखान्यांना जिल्हाधिकाऱयांमार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित कारखान्यांनी पुढील दोन दिवसांत शेतकऱयांची थकबाकी दिली नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
विविध विषयांवर चर्चा
2021-22 या वर्षातील ऊस गाळप हंगाम सुरु करण्यासंबंधी योजना, कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातून उपलब्ध होणारा ऊस आणि 2020-21 हंगामात ऊस पुरवठय़ासंबंधी शेतकऱयांसोबत केलेला द्विपक्षीय करार, ऊस तोडणी आणि वाहतूक, 2021-22 या सालातील एफआरपी, केंद सरकारची महत्त्वाकांक्षी योजना इथेनॉल आणि उसाच्या दुय्यम उत्पादनांच्या योजनेची प्रगती या विषयांवरही बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.
शेतकऱयांच्या हिताला प्रथम प्राधान्य
साखर उद्योगाचे रक्षण करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. मात्र, शेतकऱयांच्या हितरक्षणाला प्रथम प्राधान्य असणार आहे. मात्र, सरकारचे धोरण, नियमांचे पालन करून साखर उद्योग चालविण्यात यावेत.
– शंकर पाटील मुनेनकोप्प,
वस्त्राsद्योग, ऊस विकास-साखरमंत्री
कारखान्यांची थकित बिले…
साखर कारखाना थकबाकी
@ सोमशेखर एसएसके लि., बैलहोंगल 69 लाख रु.
@ जमखंडी शुगर्स लि., हिरेपडसलगी ता. जमखंडी 105 लाख रु.
@ निराणी शुगर्स लि. मुधोळ ता. जमखंडी 567 लाख रु.
@ श्री साईप्रिया शुगर्स लि. हिप्परगी ता. बागलकोट 415 लाख रु.
@ बिदर किसान साखर कारखाना लि., बिदर 209 लाख रु.
@ बसवेश्वर शुगर्स लि., कारजोळ, विजापूर 2211 लाख रु.
@ कोअर ग्रीन शुगर्स ऍण्ड फ्युएल लि., शहापूर, यादगीर 641 लाख रु.