फायटरच्य चित्रिकरणास सुरुवात
कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याने चित्रपटांचे चित्रिकरण आता पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अलिकडेच ऋतिक रोशन आणि दीपिका पदूकोन यांच्या फायटर या चित्रपटाच्या चित्रिकरणासही सुरुवात करण्यात आली आहे. ऋतिक आणि दीपिका हे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्रित काम करणार आहेत.
ऋतिक रोशनने ट्विटरवर दीपिका पदूकोन तसेच अन्य सहकाऱयांसोबतची सेल्फी शेअर केली आहे. टेकऑफसाठी गँग तयार असल्याचे ऋतिकने छायाचित्रासोबत नमूद केले आहे. फायटर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यापूर्वीही ऋतिकने वॉर चित्रपटात सिद्धार्थसोबत काम केले होते.
स्वप्नांची खरोखरच पूर्तता होते असे चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करत दीपिकाने म्हटले आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. जागतिक प्रेक्षवर्ग डोळय़ासमोर ठेवून तयार होणाऱया या चित्रपटाचे चित्रिकरण जगातील अनेक ठिकाणी पार पडणार आहे. चित्रपटाची पटकथा सशस्त्र दलाचे देशप्रेम, शौर्य आणि त्यागावर आधारित असल्याचे समजते.