शर्माजी नमकीन : 4 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
दिवंगत अभिनेते ऋषित कपूर यांचा अखेरचा चित्रपट ‘शर्माजी नमकीन’ यंदा 4 सप्टेंबर रोजी त्याच्या जन्मदिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. ऋषि कपूर यांनी स्वतःचे पूर्ण पात्र चित्रित करता आले नव्हते. अशा स्थितीत परेश रावल चित्रपटातील उर्वरित हिस्स्यात ऋषि यांचे तेच पात्र साकारणार आहेत. हिंदी चित्रपटात पहिल्यांदाच असे घडणार आहे.
चित्रपट निर्माते आणि रावल यांनी ऋषि यांच्या गौरवार्थ चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आाहे. मॅकगफिन पिक्चर्ससोबत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरकडून निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित हितेश भाटिया करत आहेत. हा चित्रपट 60 वर्षीय एका व्यक्तिरेखेवर आधारित आहे.