नवी दिल्ली
ऑटो क्षेत्रात कर्ज वितरण करण्यासाठी ऍक्सीस बँकेने कोरीयन ऑटो कंपनी हय़ुंडाई मोटार इंडिया यांच्यासोबत भागीदारी केली आहे. या योगे आता हय़ुंडाईच्या ग्राहकांना ऍक्सीसकडून कारसाठी कर्ज घेता येणं शक्य होणार आहे. ऑनलाइन रिटेल प्लॅटफॉर्म क्लीक टू बाय अंतर्गत कारसाठीचे कर्ज मंजूर करून घेण्याची संधी ग्राहकांना असणार आहे. ही भागीदारी झाल्यानंतर आता शहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांनादेखील कारसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे. आता कर्जमंजुरी ऑनलाइनही मिळवता येणार असून ग्राहकांनी जर का सर्व त्या अटी जाणून कागदपत्रे सादर केली तर त्यांना घरपोच कारही दिली जाण्याची योजना कंपनीने आखली असल्याचे समजते.