नवी दिल्ली
आयर्लंडची मूळची कंपनी ऍक्सेंचर येणाऱया काळात जागतिक स्तरावर आपल्या कार्यालयातील कर्मचाऱयांची संख्या 5 टक्के इतकी घटवणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कंपनीला हे पाऊल उचलावे लागते आहे. आयटी सल्लागार क्षेत्रातल्या या कंपनीकडून येणाऱया काळात भारतासह विविध देशातील कर्मचाऱयांची संख्या टप्प्याटप्प्याने घटवली जाणार आहे. जागतिक स्तरावर एकंदर 5 टक्के इतक्मया कर्मचाऱयांना नारळ दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनामुळे कंपनीला आपल्या खर्चावर बऱयाच मर्यादा आणाव्या लागत असून व्यवसायावरही परिणाम जाणवला आहे. एकूणच परिस्थिती कठीण झाली असल्याचे सांगण्यात येते. भारतामध्ये या कंपनीत सुमारे 2 लाख कर्मचारी सध्या कार्यरत असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली.