बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित सहाव्या बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाने अर्जुनवीर श्री साई सोशल संघाचा 25 धावानी तर केआर शेट्टी संघाने सुपर एक्स्प्रेस युनियन संघाचा 28 धावानी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. रवीचंद्रन उकळी (ऍक्सेस), वैष्णव संघमित्रा (केआर शेट्टी) सामनावीर ठरले.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्सने 20 षटकात 5 बाद 188 धावा केल्या. रवी उकळीने 1 षटकार, 7 चौकारासह 51, चेतन पांगिरेने 2 षटकार, 2 चौकारासह 38, माजीद मकानदारने 1 षटकार, 1 चौकारासह 21, अभिषेक देसाईने 2 षटकार, 1 चौकारासह 18 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे वैभव कुरीबागीने 40 धावात 2, अर्जुन पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अर्जुनवीर श्री साई सोशल संघाचा डाव 19.4 षटकात 163 धावात आटोपला. विजय पाटीलने 1 षटकार 7 चौकारासह 54, सुजय सातेरीने 4 चौकारासह 25, अर्जुन पाटील, शुभम गौंडाडकर यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. ऍक्सेसतर्फे जिनत एबीएमने 16 धावात 2, ताहिर सराफने 23 धावात 2, प्रशांत मुतकेकरने 45 धावात 2, संदीप चव्हाणने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात केआर शेट्टी किंग्ज संघाने 20 षटकात 5 बाद 190 धावा केल्या. वैष्णव संघमित्राने 4 षटकार, 10 चौकारासह 54 चेंडूत 103 धावा करून शतक झळकविले. सन्मान गोकाककरने 1 षटकार 5 चौकारासह 41 तर विनोद देवाडिगाने 2 षटकारासह 19 धावा केल्या. सुपर एक्स्प्रेस जिमखानातर्फे अमर घाळीने 26 धावात 3, रोहित पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखानाने 20 षटकात 4 बाद 162 धावाच केल्या. विठ्ठल हबिबने 7 चौकारासह 71, शिवप्रकाश हिरेमठने 1 षटकार 4 चौकारासह 44, दीपक राक्षेने 1 षटकार 1 चौकारासह 17 धावा केल्या. केआर शेट्टीतर्फे स्वयम अप्पण्णावरने 18 धावात 2 तर अनंत माळवीने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सुहास कुलकर्णी, अनिल शिंदोळकर, महांतेश देसाई, अनिल गवी यांच्या हस्ते सामनावीर रवीचंद्रन उकळी, इम्पॅक्ट खेळाडू विजय पाटील, सर्वाधिक षटकार सुशांत के., उत्कृष्ट झेल अभिषेक देसाई यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे चक्रपाणी हंगीरगेकर, विठ्ठल गवस, व प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते सामनावीर वैष्णव संघमित्रा, इम्पॅक्ट खेळाडू विठ्ठल हबिब, सर्वाधिक षटकार वैष्णव संघमित्रा, उत्कृष्ट झेल अमर घाळी यांना गौरविण्यात आले.
मंगळवारचे सामने – अर्जुनवीर श्री साई सोशल वि. मोहन मोरे, सकाळी 9 वा., साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. विश्रुत स्ट्रायकर, दु. 1 वा.