वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम
उत्तेजक चाचणी नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ऍजेक्स ऍमस्टरडॅम संघाचा गोलरक्षक आंदे ओनाना याच्यावर युफाने एक वर्षाची बंदी लादली आहे.
कॅमेरूनचा आंदे ओनाना याची 30 ऑक्टोबर रोजी उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या मूत्रल नमुन्यामध्ये निर्बंधित द्रव्याचे अंश आढळून आल्याने युफाने त्याच्यावर एक वर्षाची बंदी जाहीर केली आहे. या बंदीच्या कालावधीला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असून त्याला आता वर्षभर कोणत्याही फुटबॉल स्पर्धेत खेळता येणार नाही. युफाच्या या निर्णयाविरुद्ध ऍजेक्स ऍमस्टरडॅम संघाकडून क्रीडा लवादाकडे दाद मागितली जाणार असून त्यांना अपील करण्यासाठी काही दिवसांची मुदत देण्यात आली आहे. कॅमेरूनचा 24 वषीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ओनाना याने 2015 पासून ऍजेक्स ऍमस्टरडॅम क्लबकडून 142 सामने खेळले आहेत. तसेच त्याने कॅमेरूनच्या राष्ट्रीय संघात पंधरा वेळा स्थान मिळविले आहे.