वृत्तसंस्था/ मादीद
स्पॅनिश फुटबॉल क्षेत्रामध्ये ऍटलेटिको माद्रीद संघातील स्पॅनिशपटू दियागो कोस्टा आणि कोलंबियन फुटबॉलपटू सॅन्टीयागो ऍरेस यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयाने गुरूवारी दिले.
ऍटलेटिको माद्रीद क्लबच्या सराव प्रशिक्षण शिबिराला शुक्रवारी फेर सुरूवात होण्यापूर्वी या क्लबच्या सर्व फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये कोस्टा आणि ऍरेस हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. कोस्टा आणि ऍरेस यांना वगळून या क्लबने आपल्या प्रशिक्षण शिबिराला सुरूवात केली. कोस्टा आणि ऍरेस यांना आता त्यांच्या निवासस्थानी क्वारंनटाईनसाठी ठेवण्यात आले आहे. क्वारंनटनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कोस्टा आणि ऍरेंस यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेऊन त्यामध्ये ते निगेटिव्ह असतील तर त्यांना प्रशिक्षण सराव शिबिरात दाखल होण्यासाठी परवानगी दिली जाईल.