वृत्तसंस्था/ ऍडलेड
ऍशेस मालिकेतील सध्या येथे सुरू असलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील दिवस-रात्रीच्या दुसऱया कसोटीला कोरोनाच्या समस्येने चांगलाच धक्का दिला आहे. या कसोटीसाठी क्रिकेट प्रक्षेपण करणाऱया या सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे.
क्रिकेट प्रक्षेपण करणाऱया एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याने येथील आरोग्य खात्याने कोरोना संदर्भातील नियम अधिकच कडक केले आहेत. कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीवीर मॅकग्रा आणि इंग्लंडचा इसा गुहा यांनी आपल्या प्रक्षेपणाच्या कार्यातून माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा नियमित कसोटी कर्णधार पॅट कमिन्स या दुसऱया कसोटीसाठी कोरोना समस्येमुळे उपलब्ध होवू शकला नाही. कोरोना बाधित व्यक्तीशी एका हॉटेलमध्ये संपर्कात आल्याने कमिन्सने या दुसऱया कसोटीतून माघार घेतली आहे.