वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाची टॉप सीडेड महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टीला पुढील आठवडय़ात ऍडलेडमध्ये खेळविल्या जाणाऱया डब्ल्यूटीए टूरवरील महिलांच्या आंतरराष्ट्रीय 500 दर्जाच्या टेनिसमध्ये स्पर्धा आयोजकांनी वाईल्डकार्डद्वारे प्रवेश दिला आहे.
24 वषीय बार्टीला येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. ऍडलेड स्पर्धेतील बार्टी ही विद्यमान विजेती आहे. 535,530 ऑस्ट्रेलियन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेची ऍडलेड टेनिस स्पर्धा 22 ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाणार आहे. बार्टीने अलीकडेच यारा व्हॅली क्लासिक महिलांची टेनिस स्पर्धा जिंकली होती. 2019 साली बार्टीने फ्रेंच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते.