अत्याधुनिक यंत्रणा उभारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एलजी ग्रुप ऍडव्हान्स आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या (एआय) डेव्हलपमेंटसाठी मोठय़ा प्रमाणात येत्या काळात प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी कंपनी येत्या तीन वर्षामध्ये जवळपास 733 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे.
सदरची सिस्टम ही मानवाच्या डोक्यासारखी आहे. ज्यामध्ये मोठय़ा प्रमाणात डाटाची मदत मिळणार आहे. स्वतंत्रपणे शिकणे, निर्णय क्षमता आणि कार्यवाही करण्याचे काम ही यंत्रणा करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये एआय सिस्टमची स्थापना करण्यासाठी एलजी आघाडीवरच्या कम्प्युटिंग पायाभूत सुविधांची मदत घेणार आहे. ज्यामध्ये प्रति सेकंद 95.7 क्वाड्रिलियनची मोजणी होणार आहे.
केटीसोबत काम
एलजी स्मार्ट होम सोल्यूशन्स केटीच्या एआय प्लॅटफॉर्मसोबत काम करणार आहे. ज्यामध्ये रेडिओ, संगीत आणि अन्य डिजिटल सेवा सादर करणार आहे.
एलजीचा स्मार्टफोन व्यवसाय बंद
एलजी इलेक्ट्रॉनिक्सने स्मार्टफोन्सची निर्मिती आणि विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनी येत्या 31 जुलैनंतर स्मार्टफोन्सचे उत्पादन आणि विक्री बंद करणार आहे.