प्रतिनिधी /पणजी
ऍड. अजितसिंह राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून जुन्या घरात पुन्हा आल्याचा भास होतोय असे निवेदन त्यांनी केले. त्यावेळी गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे व राजकुमार देसाई उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर आपण आकर्षित झालो असून त्याचा परिणाम म्हणून भाजपात आल्याचा दावा त्यांनी केला. कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे काम चालूच ठेवणार असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कामगारांसाठी ‘लकी’ आहेत. भाजपच सध्या जनतेसाठी योग्य पर्याय असल्याचे ते म्हणाले.