प्रतिनिधी /पणजी
यंदाचा ‘राष्ट्रीय न्या. रानडे विधी विशारद भूषण 2021 पुरस्कार तिस्क फोंडा येथील ऍड. सुरेश रायकर यांना प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सरकार पुरस्कार प्राप्त, जनकल्याण समाजसेवा संस्थेने हजारो नामांकन मधून ऍड. रायकर यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. भारताचे पोर्ट आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ऍड. रायकर यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यांच्या समाजपयोगी विविध विधी कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना प्राप्त होत आहे. या पूर्वी त्यांना अकरा राष्ट्रीय व दोन राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत.