कंपनीचे समभाग 1.6 टक्क्यांनी मजबूत
नवी दिल्ली : जगातील सर्वात मूल्यवान कंपनी म्हणून कार्यरत असणाऱया ऍपल या कंपनीचे बाजारमूल्य हे 3 ट्रिलियन डॉलरच्या जवळपास पोहोचले आहे. अमेरिकन दिग्गज टेक कंपनीचे बाजारमूल्य या अगोदर भारताच्या जीडीपीपेक्षा अधिक झाले आहे.
बुधवारी कंपनीचे समभाग 1.6 टक्क्यांच्या तेजीसोबत 174 डॉलरवर ट्रेड करत होते. 3 ट्रिलियन डॉलरचे बाजारमूल्य प्राप्त करण्यासाठी कंपनीचे समभाग 182.85 डॉलरवर पोहचले आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार जवळपास एक वर्षाच्या अगोदर ऍपलने 2 ट्रिलियन डॉलरचे बाजारमूल्य प्राप्त केले होते. चालू वर्षात स्टॉकमध्ये 30 टक्के तेजी आली आहे. याच दरम्यान एस ऍण्ड पी 500 मध्ये 25 टक्के तेजी आली आहे.