सॅनफ्रान्सीस्को
आयफोन निर्माती प्रसिद्ध कंपनी ऍपलने आपला नवा आयफोन 12 आणण्याची तयारी चालवली असून याची किंमत आता अपेक्षेपेक्षा जास्त असणार आहे, असे सांगण्यात येत आहे. या फोनसोबत कंपनी 4 उत्पादने बाजारात आणणार असल्याचे समजते. 5 जीचे फिचर असणारा हा नवा स्मार्टफोन मागच्या वर्षी बाजारात आलेल्या फोनपेक्षा जास्त किंमतीचा असणार आहे. म्हणजे मागच्या फोनपेक्षा नव्या फोनची किंमत अपेक्षेपेक्षा जास्त असेल. याखेपेस साहित्याच्या किंमतीत 50 डॉलरपर्यंत वाढ झाली असल्याचे कारण कंपनीने दिले आहे. किमतीवर नियंत्रण मिळव ण्यासाठी आता कंपनीने प्रयत्न सुरू झाले असून कंपनी बॉक्समध्ये चार्जर, वायर इयरफोनचा समावेश करणार नसल्याचे सांगण्यात येते. मिळालेल्या माहितीनुसार विविध फोन्सची किंमत 47 हजार ते 55 हजारपर्यंत असणार असल्याचे समजते.