कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग कार्यक्रमात सादरीकरण
नवी दिल्ली
बहुप्रतिक्षीत असा ऍपलचा आयफोन 13 अखेर मंगळवारी रात्री उशीरा कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग कार्यक्रमात लाँच करण्यात आला आहे. यासोबत स्मार्टवॉच, आयपॅडही सादर करण्यात आले आहेत.
आयफोन 12 सिरीजप्रमाणे आयफोन 13 चार प्रकारात लाँच करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 7 सिरीजअंतर्गत स्मार्टवॉच, आयपॅड 2021 आणि आयपॅड मिनी 2021 यांचेही सादरीकरण आले आहे. या फोनमध्ये नॉचचा आकार कमी करण्यात आला असून स्क्रीन मोठी वाटते आहे. महत्त्वाचे म्हणजे आयफोन 13 सिनेमॅटीक मोडच्या वैशिष्टय़ासह येणार असून यामुळे व्हिडीयो सिनेमाच्या शैलीत सादर करता येणार आहेत. चित्रपट निर्मिती करू इच्छिणाऱयांसाठी हा फोन लाभदायक ठरणार आहे.
आयफोन 13 चा बेस मॉडेल 128 जीबीसह आला असून 13 मिनीत 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेजचा पर्याय असेल तर प्रो आणि प्रो मॅक्स फोन 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबीसहीत येणार आहेत.
?आयफोन 13 प्रो व आयफोन 13 प्रो मॅक्स यांच्या किंमती 1 लाख 19 हजार 900 आणि 1 लाख 29 हजार 900 रुपये असणार आहे.
?आयफोन 13 व आयफोन 13 मिनी यांच्या किंमती 69 हजार 900 रुपये आणि 79 हजार 900 रुपये असणार आहेत.
?आयपॅडच्या किमती 46 हजार 900 ते 60 हजार 900 रुपये असणार आहेत.