नवी दिल्ली : जगातील टेक आणि आयफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी ऍपल इंडियाचा व्यवसाय वधारला आहे. अशी माहिती आर्थिक वर्ष 2020 च्या आकडेवारीतून समोर आली आहे. बिजनेस इंटेलीजेंस प्लॅटफॉर्म टॉफलरच्या माहितीनूसार आर्थिक वर्ष 2020मध्ये ऍपल इंडियाचा महसूल 29 टक्क्यांनी वधारुन 13,755.8 कोटी रुपयावर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये ऍपल इंडियाचा महसूल 10,673.7 कोटी रुपये होता. टॉफलरच्या तुलनेत नफा कमाईत अनेक पटीने वाढ होऊन 926.2 कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे. एक वर्षाच्या समान तिमाहीध्ये 262.27 कोटी रुपयावर राहिला होता. प्रीमियम स्मार्टफोन सेगमेंटमध्ये ऍपलची टक्कर ही थेट सॅमसंग आणि वनप्लस यासारख्या कंपन्यांसोबत राहणार आहे. याच्यासह ऍपलने भारतीय बाजारात आपली तेजी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने भारतामध्ये विक्रीचा नवा विक्रम नोंदवला असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी दिली आहे.
आयफोन-11 चे उत्पादन भारतात ऍपल विस्ट्रॉन आणि फॉक्सकॉन यासारख्या कंपन्यांसोबत अनेक स्मार्टफोन उत्पादनासाठी हात मिळवणी करण्यात आली आहे. परंतु यामध्ये ऍपलकडून भारतात आयफोन-11 या मॉडेलचे उत्पादन वेगाने सुरु केल्याची माहिती कंपनीने दिली आहे.