आयफोन्ससह स्मार्टफोन्स विक्रीवर लक्ष चौथ्या तिमाहीत 2 टक्के वाटा अपेक्षीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयफोन निर्माती कंपनी ऍपल या वर्षात स्मार्टफोनच्या भारतातील जहाजामार्गे होणाऱया वाहतूकीत (शिपमेंट) 16 ते 22 टक्के इतकी वाढ दर्शवू शकते, असा अंदाज कंपनीने वर्तवला आहे.
चीनकडून होणारा स्मार्टफोन्सचा हा पुरवठा 2019 च्या तुलनेमध्ये 4 टक्के अधिक असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. एक्सआर आणि 11 आयफोन तसेच आय फोन 12 मिनी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर येणाऱया काळात वरील वाढीव कामगिरी ऍपलला करता येणे शक्मय होणार आहे.
भारतातील स्मार्टफोन्सची बाजारपेठ ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बऱयाच अंशी प्रभावित झालेली आहे. पुरवठय़ाच्या नियोजनात मध्यंतरी अडचणी जाणवल्या होत्या. पण आता त्या दूर होतील असे कंपनीला वाटते. ऍपलने भारतात आयफोनच्या बाबतीत वर्चस्व साधलेलं असून आर्थिक वर्ष 2020 च्या चौथ्या तिमाहीत ऍपल 2 टक्के इतका वाटा काबीज करू शकते असा अंदाजही बांधला जातआहे.
येणाऱया उत्सवी काळामध्ये बँकांच्या योजना आणि सवलतीच्या जोरावर आयफोनच्या विक्रीवर सकारात्मक परिणाम दिसेल असे सांगितले जात आहे. जुन्या मॉडेलच्या किंमतीवरही चांगली सवलत कंपनी देणार असल्याचे सांगण्यात येते.