4500 किलो वजनाचा ब्रिज
4 रोबोट्सनी मिळून केली निर्मिती
नेदरलँडची राजधानी ऍमस्टरडॅममध्ये जगातील पहिला 3डी प्रिंटेड स्टील ब्रिज तयार करण्यात आला आहे. याच्या डिझाइनपासून तयार करण्यापर्यंतचे काम रोबोट्सनी केले आहे. हा ब्रिज 4500 किलो स्टीलद्वारे निर्माण करण्यात आला असून तो ऍमस्टरॅडममधील सर्वात जुन्या कालव्यावर बसविण्यात आला आहे.
12 मीटर लांबीचा हा ब्रिज 4 रोबोट्सनी मिळून तयार केला आहे. हा ब्रिज तयार होण्यास सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. हा ब्रिज नौकेच्या मदतीने आणला गेला आणि नंतर क्रेनद्वारे या कालव्यावर बसविण्यात आला आहे. ब्रिजशी संबंधित सर्व डाटा कॉम्प्युटरमध्ये फीड केला जाईल, जेणेकरून पुढील वेळी ब्रिज तयार करण्यास मदत मिळणार असल्याचे संबंधित कंपनीने म्हटले आहे.
ब्रिजची स्थिती तपासणार सेंसर
कंपनीने या स्टील ब्रिजला एमएक्स3डी नाव दिले आहे. हा ब्रिज किती लोकांचा भार सहन करू शकेल, तापमान वाढल्यास-घटल्यास कुठला प्रभाव पडेल आणि किती मजबूत असेल या सर्व मापदंडांची पूर्तता करणारा ठरला आहे. ब्रिजमध्ये 12 हून अधिक सेंसर बसविण्यात आले असून त्यांच्या मदतीने पुलाच्या मजबुतीशी संबंधित सर्व माहिती मिळाल्यावरच तो सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
दुर्घटनेपूर्वी अलर्ट
ब्रिजच्या डिजिटल मॉडेलवर कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या मार्क गिरोलामी यांनी काम केले आहे. इंजिनियर्स अनेकदा ब्रिजचे नुकसान होण्याच्या धोक्यांवर लक्ष देत नाही. पण आम्ही यावर लक्ष दिले आहे. भविष्यात अशा ब्रिजचे नुकसान होण्यापुव अलर्ट देण्यात येणार असल्याचे गिरोलामी यांनी म्हटले आहे. ब्रिजशी संबंधित इंजिनियर्स या मॉडेलचे अध्ययन करतील आणि 3डी प्रिंटेड स्टीलचा वापर करून बहुमजली इमारत तयार करता येईल की नाही याचा शोध घेणार आहेत. 3डी प्रिंटेड स्टील अत्यंत मजबूत असते असे गिरोलामी यांनी सांगितले आहे.