ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
ऍमेझाँन 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतावर उपकार करत नाहीत, अशी टिप्पणी करून वादात सापडलेल्या केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज आपण ऍमेझाँन विरोधी नाही असे सांगत ऍमेझाँनच्या गुंतवणुकीचे स्वागत केले.
दरम्यान गोयल यांच्या या वक्तव्यावरून कॉर्पोरेट क्षेत्रात नाराजी दिसत असल्याने गोयल यांनी आज याबाबत खुलासा केला. ते म्हणाले, मी ऍमेझाँनच्या विरोधात नाही, मात्र कंपनीने कायद्याच्या चौकटीत राहून गुंतवणूक केली पाहिजे. आपण जे काही बोललो ते कायदा आणि नियमाचे पालन व्हावे या उद्देशाने बोललो, असं ही ते म्हणाले.
गोयल म्हणाले, भारतात ई-कॉमर्स बाजारपेठ झपाटय़ाने वाढत आहे. इथे लहान व्यापारी आणि घाऊक व्यापाऱयांचे हीत जपणे आवश्यक आहे. भारतातील कायदा आणि नियमांच्या चौकटीत राहून जे गुंतवणूक करतील त्यांच स्वागत आहे. मात्र या निमित्ताने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱयांवर अन्याय होऊ नये.