ऍमेझॉनची आयआरसीटीसीसोबत भागीदारी
मुंबई
ई-कॉमर्स क्षेत्रातील नावाजलेल्या ऍमेझॉन इंडियाने नुकतीच एक महत्वाची भागीदारी करण्यात यश मिळवले आहे. ऍमेझॉन इंडियाने आयआरसीटीसी अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्याशी भागीदारी केली असून ग्राहकांना यापुढे रेल्वेची तिकिटे बुक करता येणार आहेत. ऍमेझॉनच्या माध्यमातून ग्राहकांना आपली तिकिटे बुक करता येतील. याअंतर्गत ग्राहकांना विमान, बस व रेल्वेची तिकिटे एकाच छताखाली बुक करण्याची सोय होणार आहे.