भारतामधील व्यवसायांचा समावेश : नुकसान सहन करत गुंतवणुकीकडे कल
मुंबई : दिग्गज ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी म्हणून ओळख असणारी ऍमेझॉनने भारतीय बाजारात पेमेंट व घाऊक व्यवसायातील युनिट्समध्ये आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान 11,400 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ऍमेझॉनकडून ही गुंतवणूक देशातील डिजिटल कॉमर्स बाजारात आपली हिस्सेदारी वाढविण्यासाठी केली आहे. कंपनीला नुकसान होत असतानाही ही गुंतवणूक ठेवल्याची माहिती आहे.
उपलब्ध माहितीनुसार ऍमेझॉन सेलर सर्व्हिसेस, ऍमेझॉन होलसेल(भारत), ऍमेझॉन पे(भारत) आणि ऍमेझॉन ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसला आर्थिक वर्ष 2018-1919 मध्ये 7014.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. जे 2019-20 मध्ये वधारुन 7899 कोटी रुपयांच्या घरात राहिले आहे. भारतीय ग्राहकांना ई-कॉमर्स आणि अन्य प्रकारातील डिजिटल उत्पादनासह सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यावर येणाऱया काळात जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केले आहे.
ऍमेझॉन पे वरील खर्चात 62 टक्के वाढ
ऍमेझॉन पे ला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये एक वर्षाच्या तुलनेत एकूण खर्च 62 टक्क्यांनी वधारुन 3234.8 कोटी रुपये झाला आहे. ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांनी घोषणा केल्याप्रमाणे भारतामध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यातून देशभरातील लहान आणि मध्यम वर्गातील व्यापाऱयांना ऑनलाईन लाभ घेण्याची संधी मिळेल. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही ऍमेझॉनच्या सेलर सर्व्हिसला मिळाली आहे.