मुंबई
भारतात सणासुदीच्या या मोसमामध्ये “वी आर ऍमेझॉन’’ मोहीम सुरू करत ऍमेझॉन यंदाही ग्राहकांना सणासुदीचा आनंद घरपोच करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱया आपल्या कर्मचाऱयांचा कौतुक सोहळा साजरा करत आहे. याद्वारे कंपनीने कर्मचारी, सहकारी आणि भागीदारांना या मोहिमेद्वारे प्रकाशझोतामध्ये आणले आहे. आपल्या टीमच्या कार्याचे महत्त्व पटवणारा टीझर कंपनीने प्रदर्शित केला आहे. या मोहिमेविषयी सविस्तर बोलताना उपाध्यक्ष दीप्ती वर्मा म्हणाल्या, आमच्या सर्व कर्मचाऱयांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा व ‘जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयर’ व ‘काम करण्यासाठीचे उत्कृष्ट ठिकाण’ बनण्याच्या आमच्या प्रयत्नांची परिणती म्हणजे हा प्रयोग आहे. आमची सहकार्याची कार्यसंस्कृती आणि सणासुदीच्या मोसमामध्ये ऍमेझॉनियन्स ग्राहकांच्या सेवेसाठी एकत्र येतात आणि त्यांना खरेदीचा असाधारण अनुभव मिळवून देतात.