वृत्तसंस्था/ मुंबई
इ-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉनने आपल्या युपीआयचा वापर करणाऱया ग्राहकांची संख्या 5 कोटीर पोहचली असल्याचे म्हटले आहे. कंपनीने ऑनलाइन वस्तुंच्या बाजारात अग्रस्थान राखले आहे. कंपनीच्या माहितीनुसार 2 कोटी दुकानांवर लोकांनी युपीआय क्युआर कोडचा वापर करून ऍमेझॉनच्या पे ऍपच्या माध्यमातून खरेदी केली असल्याचे समजते.
गेल्या 1 वर्षात ऍमेझॉन युपीआयचा वापर करणाऱयांपैकी 75 टक्के ग्राहक हे टायर टू आणि टायर थ्री शहरातील असल्याचे ऍमेझॉनने म्हटले आहे. या शहरात कंपनीचे अस्तित्व वाढत आहे. स्थानिक दुकानांसह ग्राहक आपले फोन, डीटीएचचे रिचार्ज करण्यासाठी, ओळखीच्यांना पैसे पाठवण्यासाठी, वेतन देण्यासाठी युपीआयचा वापर होताना दिसतो आहे.