वारानसी
ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी ऍमेझॉनने आपल्या फ्लेक्सी डिलीवरी योजनेचा विस्तार 35 शहरात करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत अनेकांना रोजगाराच्या संधी ऍमेझॉनकडून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जागतिक स्तरावरची ही सेवा 2019 जूनमध्ये सुरू केली आहे. या अंतर्गत उमेदवारांना पार्टटाईम (अर्धवेळ) नोकरी उपलब्ध होईल. 35 विस्तारीत शहरात हुबळीचाही(कर्नाटक) समावेश असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.