वृत्तसंस्था नवी दिल्ली
कोविड19चे वाढते संकट लक्षात घेत अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ई कॉमर्स क्षेत्रात कार्यरत असणारी दिग्गज कंपनी ऍमेझॉन इंडिया देशातील विपेत्यांसाठी पूर्णपणे मोफत स्वरुपाचा कोविड 19 आरोग्य विमा देणार आहे.
ऑनलाइन विक्रीत ऍमेझॉनची लोकप्रियता अधिक आहे. कोविड-19 चा संसर्ग झाल्यास त्यासाठी उपचार घेण्यास रुग्णालयात जावे लागल्यास आकारण्यात येणाऱया खर्चाचा विचार करुन विम्याची सुविधा देणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
रुग्णालयातील उपचारासह ऍम्बुलन्सची मदत आणि आयसीयू यासोबत येणाऱया खर्चासाठी 50,000 रुपयापर्यंतची तरतूद सदर विम्यातून करण्यात आली आहे. हा विमा उतरविल्यानंतर एक वर्ष कालावधीपर्यंत ही सुविधा असणार आहे.
ऍमेझॉन इंडियाने ही सुविधा विपेत्यांना देण्यासाठी विमा पॉलिसी वितरक आणि औषध अन्य विभागाशी एकत्रित येत जनरल इन्शुयन्ससोबत भागीदारी केली आहे.
जानेवारी 2019 पासून 26 मे 2020 पर्यंतच्या कालावधीत ऍमेझॉनवर कार्यरत असणाऱया लाखो विक्रेत्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.