इकॉमर्स कंपनीची महत्वपूर्ण कामगिरी -2025 पर्यंत 10 लाख जणांना नोकरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ई कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऍमेझॉन इंडियाने रोजगाराच्या बाबतीमध्ये महत्त्वाचे पाऊल उचलले असून उत्सवापूर्वीच भारतामध्ये या कंपनीने सुमारे एक लाखाहून अधिक जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
सदरच्या कंपनीने मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळूर, कोलकाता, लखनऊ आणि चेन्नई यासह इतर शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या अनेक जणांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. ऍमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार 1 लाख 10 हजार जणांना उत्सवापूर्वीच विविध पदांवर भरती करून घेतले आहे. 2025 पर्यंत भारतामध्ये 10 लाख जणांना नोकरी मिळवून देण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे. यामध्ये वस्तूंचा पुरवठा करणारे कर्मचारी, पॅकिंग, शिपिंग अशा विविध विभागांमध्ये नव्या कर्मचाऱयांना सामावून घेतले गेले आहे.
ऍमेझॉनचा विस्तार
ऍमेझॉनची 15 राज्यांमध्ये 60 हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे 1700 इतकी ऍमेझॉन मालकीची आणि भागीदारीतील डिलिव्हरी स्टेशन्स भारतभरात कार्यरत आहेत. विविध वस्तुंच्या मागणीचा वाढत कल पाहून त्याप्रमाणे नेटवर्कचे जाळे विस्तारण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.
जुलै-डिसेंबर काळात 17 टक्के प्रेशर्सना संधी
टीमलिज या संस्थेने येणाऱया काळात नोकरीच्या संधी भारतात वाढणार असल्याचे म्हटले असून जुलै-डिसेंबर 2021 काळात 17 टक्के नव्या उमेदवारांना भरतीची संधी प्राप्त होणार आहे.