नवी दिल्ली
गेल्या बऱयाच वर्षापासून इलेक्ट्रीक स्कुटर्सची भारतात विक्री करणाऱया ऍम्पीयरकडून लवकरच भारतीय बाजारात मायलेजवाली इलेक्ट्रीक स्कुटर आणली जाणार आहे. सदरची नवी स्कूटर एका चार्जवर सुमारे 75 कि. मी. पर्यंतचे मायलेज देऊ शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे हे नवे सहावे उत्पादन असेल. येत्या 15 जूनला या गाडीचे भारतात लाँचिंग केले जाणार असल्याचे समजते. अनलॉकनंतर भारतीय बाजारात लाँच होणारी कंपनीची पहिली नवी इलेक्ट्रीक स्कुटर असणार आहे. झील स्कुटरमध्ये जी बॅटरी वापरली आहे तीच नव्या गाडीत वापरली जाणार असल्याचे समजते.