प्रतिनिधी/ मडगांव
केपे तालुक्यातील कोणीर-पिर्ला येथील एका गरोदर महिलेने अ??म्ब्युलन्समध्ये बाळाला जन्म देण्याचा प्रकार काल गुरूवारी सकाळी घडला. प्रसुती वेदनाने तळमळणाऱया या महिलेला 108 ऍम्ब्युलन्सचे कर्मचारी ईएमटी विठ्ठल यांनी वेळीच मदत केल्याने त्यांचे सर्व कौतुक होत आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी देखील 108 ऍम्ब्युलन्सच्या कर्मचाऱयांचे अभिनंदन केले आहे.
काल सकाळी 9.40 च्या सुमारास नेत्रावली येथील ऍम्ब्युलन्सच्या कर्मचाऱयांना एक फोन आला. त्यात केपे तालुक्यातील कोणीर-पिर्ला येथे एका गरोदर महिलेला तातडीने हॉस्पिटलात नेण्यात यावे असा संदेल मिळाला. कोणीर-पिर्ला हे गाव सुमारे 23 किलोमीटर अंतरावर खाण क्षेत्रात असून या ठिकाणी जाणाऱया मार्गावर खनिज मालामुळे चिखल झाला होता. त्यातून मार्ग काढीत सकाळी दहाच्या सुमारास रुग्णवाहिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
पहाटेपासूनच प्रसूतीच्या वेदनामुळे या महिलेला ताणतणाव होता. रूग्णवाहिका कर्मचाऱयांनी झोपडीत प्रवेश केला तेव्हा, त्या महिलेला रक्तस्त्राव सुरू झाला होता. रुग्णवाहिका कर्मचाऱयांनी तिला तातडीने रुग्णवाहिकेत हलवले आणि सकाळी 10.20 वाजता घटनास्थळावरून हॉस्पिटलकडे निघाले. हॉस्पिटल 13 किमी अंतरावर होते.
हॉस्पिटलकडे जात असताना वाटेत या गरोदर महिलेच्या प्रसूती वेदना वाढल्या. यावेळी तिला पॅरामेडिकल ईएमटी विठ्ठलने तिला मदत करताना रुग्णवाहिकेत प्रसूती केली. बाळ आणि आई दोघांनीही बाळळी आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून दोघेही सुरक्षित आहेत. 108 रूग्णवाहिकेच्या कर्मचाऱयांचे या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.