वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम
रविवारी येथे झालेल्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात ओली व्हॅटकिन्सच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर ऍस्टोन व्हिलाने फुटबॉल क्लबने बलाढय़ लिव्हरपूलचा 7-2 अशा गोल फरकाने दणदणीत पराभव केला.
या विजयामुळे ऍस्टोन व्हिला संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍस्टोन व्हिलाने 64 गुण नोंदविले आहेत. अद्याप तो लिव्हरपूलच्या मागे आहे. 1963 नंतर प्रथमच लिव्हरपूल संघाला कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी संघाकडून सात गोलांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला आहे. ऍस्टोन व्हिलातर्फे व्हॅटक्सिनने तीन गोल नोंदविले. व्हॅटकिन्सचा पहिला गोल चौथ्या मिनिटाला तर दुसरा गोल 22 व्या मिनिटाला नोंदविला गेला. 31 व्या मिनिटाला लिव्हरपूलचे खाते मोहम्मद सलाने उघडले. 39 व्या मिनिटाला व्हॅटकिन्सने तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली.