नवी दिल्ली
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने 5 जी सेवेबाबत आपल्या कार्याला वेग दिला असून याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात 5 जी सेवेची चाचणी घेण्यात आली. एअरटेलने ही चाचणी उपकरण निर्माती कंपनी एरिक्सनसोबत केली आहे. दिल्ली एनसीआरजवळील भैपूर ब्रमनम गावात ही चाचणी घेण्यात आली असून बऱयापैकी यशस्वी झाल्याचे समजते. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डीओटी) अर्थात दूरसंचार विभागाने एअरटेलला 5 जी चाचणी करता परवानगी दिली आहे.