बेळगाव : एअरमन टेनिंग स्कूलतर्फे रविवारी रन फॉर युनिटी या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिन व आझादी का अमृतमहोत्सव अशा संयुक्त कार्यक्रमानिमित्त या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 100 हून अधिक सैनिकांनी या 7.5 कि. मी. मिनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला होता. मॅरेथॉनचे उद्घाटन एअरमन टेनिंग स्कूलचे एअर कमांडिंग ऑफीसर एस. डी. मुकुल यांच्या हस्ते करण्यात आले.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आझादी का अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. भारताचे लोहपुरुष समजले जाणाऱया वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा केला जात आहे. विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.