नवी दिल्ली
देशातील वरिष्ठ नागरिकांसाठी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने नव्या वर्षाकरीता मोठी ऑफर घोषित केली आहे. याअंतर्गत 60 वर्षावरील वरिष्ठ नागरिकांना कमी किंमतीत तिकीट रक्कम भरून विमान प्रवास करता येणार आहे. या सवलतीच्या प्रवासाबाबतची सविस्तर माहिती कंपनीने आपल्या संकेतस्थळावर दिली असल्याचे समजते. नव्या ऑफरअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना इकॉनॉमी केबिनमधून 50 टक्के सवलतीच्या तिकीटावर प्रवास करण्याची संधी मिळणार असल्याचे समजते.