‘टाटा सन्स’ची 18,000 कोटींची बोली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एअर इंडियाच्या विक्रीची बोली जिंकत टाटा समुहाने अखेर ‘वेलकम बॅक’ केले आहे. यासंदर्भात सरकारकडून शुक्रवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीसाठी टाटा सन्सने सर्वाधिक 18,000 कोटी रुपयांची बोली लावली. या वर्षाच्या डिसेंबरअखेर हा करार पूर्ण होण्याची शक्मयता आहे. ‘एअर इंडिया’ ताब्यात येण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रतन टाटा यांनी ‘वेलकम बॅक, एअर इंडिया’ असे ट्विट केले आहे.
टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18,000 कोटी रुपयांची बोली लावली. त्याचवेळी या शर्यतीत सहभागी असलेल्या अजय सिंग यांनी 15,100 कोटी रुपयांची बोली लावली. अखेरीस टाटा सन्सने एअर इंडियाच्या मालकीची बोली 2,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त फरकाने जिंकली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडियासाठी पाच बोलीदारांची निविदा नाकारण्यात आली. ते सरकारने निर्देशित केलेल्या अटी पूर्ण करू शकले नाहीत.
बोली जिंकल्यानंतर आता नजिकच्या काळात एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहेत. जेव्हा एअर इंडिया विजेत्या बोलीदाराच्या हातात जाईल, तेव्हा त्याच्या ताळेबंदावरील 46,262 कोटी रुपयांचे कर्ज सरकारी एआयएएचएलकडे जाईल, असे ‘डीआयपीएएम’चे सचिव तुहिनकांत पांडे यांनी स्पष्ट केले आहे. सरकार चार महिन्यात नवीन बोलीदार अर्थात टाटाला संपूर्ण विमान कंपन्यांची जबाबदारी देणार असून येत्या पंधरवडय़ातच हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या विक्रीच्या प्रक्रियेनंतर आता टाटा सन्सच्या देशात 3 विमान कंपन्या होणार आहेत.
कर्मचारी एक वर्षासाठी सेवेत कायम राहणार
सरकार आणि बोलीदार कंपनीतील करारानुसार एअर इंडियाच्या जमिनी आणि इमारतींसह कोणत्याही मालमत्तेची सद्यस्थितीत विक्री केली जाणार नाही. 14,718 कोटी रुपयांच्या या मालमत्ता कंपनीला दिल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच करारांतर्गत एअर इंडियाचे सध्याचेच कर्मचारी किमान एक वर्षासाठी कायम ठेवावे लागतील. त्यानंतर दुसऱया वर्षापासून व्हीआरएसची सूचना कंपनीकडून केली जाऊ शकते.
राखीव किंमत 12,906 कोटी
विक्री प्रक्रियेमध्ये सरकारने एअर इंडियाची राखीव किंमत 12,906 कोटी रुपये इतकी निश्चित केली होती. एअर इंडियाची किंमत त्याच्या एंटरप्राइझ मूल्यानुसार होती. आता विजेत्या टाटा समूहाला 15,300 कोटी रुपयांचे कर्जही घ्यावे लागेल. एअर इंडियावर एकूण 43 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाढले आहे. तथापि, सरकार हे कर्ज स्वतः घेणार असल्याने टाटा समूहावर 23 हजार कोटींचे कर्ज असणार आहे.
बोली जिंकल्यानंतर रतन टाटा भावुक
रतन टाटांची ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘वेलकम बॅक’ या ट्विटखाली एक मजकूर असलेली इमेजही त्यांनी जोडलेली आहे. या मजकुरात “टाटा ग्रुपने एअर इंडियासाठी बोली जिंकली ही एक चांगली बाब आहे. एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल यात शंका नाही. या निर्णयामुळे विमान उद्योगात टाटा समूहाच्या उपस्थितीसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे’’ असे नमूद करण्यात आले आहे. आता टाटा समूहाला एअर इंडियाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये असलेली प्रतिमा आणि प्रति÷ा पुन्हा निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. याक्षणी जेआरडी टाटा आमच्यामध्ये असले असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, असे भावुक उद्गारही त्यांनी काढले आहेत.
अजय सिंग यांनी केले टाटांसह सरकारचे अभिनंदन
या यशस्वी बोलीनंतर स्पाइसजेटचे प्रमुख आणि दुसऱया क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंग यांनी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले आहे. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब होती असेही सिंग म्हणाले. तसेच एअर इंडिया कंपनीची प्रति÷ा टाटा समूह परत आणू शकेल आणि भारताचा अभिमान उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
…………
एअर इंडियाची आतापर्यंतची झेप…
1932 ः जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा एअरलाईन्सची स्थापना
1946 ः टाटा एअरलाईन्सचे नाव बदलून ‘एअर इंडिया’ असे केले
1948 ः 8 जून रोजी मुंबई ते लंडन हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण
1953 ः सरकारने देशातील सर्व विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले
1954 ः टोकियो, बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग या फेऱयांना प्रारंभ
1962 ः जगातील पहिली ‘ऑल-जेट’ म्हणून एअर इंडिया सन्मान
1997 ः स्वतःची वेबसाईट लॉन्च करत एअर इंडिया झाली ऑनलाईन
2005 ः ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या लो कॉस्ट एअरलाईन्सचा प्रारंभ
2007 ः ‘इंडियन एअरलाईन्स’ आणि ‘एअर इंडिया’चे विलीनीकरण
2012 ः नुकसानीमुळे देशातील हवाई कंपन्यांमध्ये चौथ्या स्थानी घसरण
2018 ः एअर इंडियाचा 76 टक्के हिस्सा विक्रीची सरकारकडून घोषणा
2020 ः सुधारित नियोजनानुसार 100 टक्के हिस्सा विक्रीची प्रक्रिया सुरू