प्रतिनिधी / बेळगाव
भारतीय हवाईदलाचे ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफीसर कमांडींग इन चीफ एअरमार्शल आर. डी. माथूर यांनी सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूलला भेट दिली. बुधवार दि. 21 व गुरुवार दि. 22 रोजी ते बेळगावात होते.
एअर ऑफीसर कमांडींग एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे एस. डी. मुकुल यांनी त्यांचे स्वागत केले. आर. डी. माथूर यांनी हवाई योध्यांशी बातचीत केली. उच्च दर्जाचे व तांत्रिकदृष्टय़ा प्रशिक्षणाची आवश्यकता सांगतानाच त्यांनी प्रशिक्षणातील तांत्रिक बदलांचे कौतुक केले.