अभयकुमार करडी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित अभयकुमार करडी स्मृती चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एआयएम क्रिकेट अकादमी संघाने फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा 228 धावानी पराभव करून 2 गुण मिळविले. नीरज जाधवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर महाविद्यालय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत एआयएम क्रिकेट अकादमी संघाने 41 षटकात 8 बाद 309 धावा केल्या. नीरज जाधवने 12 चौकारासह 88, सेजल खतीबने 7 चौकारासह 41, अथर्व तोरसकरने 7 चौकारासह 45, पार्थ नारने 7 चौकारासह 38 धावा केल्या. फर्स्ट अकादमीतर्फे श्रेयस एन.ने 52 धावात 3, अभिषेक करगुप्पीने 83 धावात 2, दीपकने 61 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना फर्स्ट क्रिकेट अकादमी संघाचा डाव 20.1 षटकात सर्व बाद 81 धावात आटोपला. आकाश कम्मारने 21 तर दीपकने 20 धावा केल्या. एआयएम अकादमीतर्फे रूदेश कर्निकने 18 धावात 3, पराग आरबीकरने 8 धावात 2, अस्मा खानने 28 धावात 2, आर्यन दुधवाडकरने 16 धावात 2 गडी बाद केले.