नवी दिल्ली : कोरोनामुळे चालू वर्षी होणारी एएफसी चषक फुटबॉल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने गुरूवारी जाहीर केला.
आशिया खंडातील ही द्वितीय विभागीय क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मात्र, मार्चपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा तहकूब किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. बऱयाच स्पर्धा प्रेक्षकांविना खेळविल्या जात आहेत. 2020 सालातील एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धा 14 सप्टेंबरपासून कतारमध्ये खेळविली जाणार आहे. एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेमध्ये पाच विभागांचा संपर्क येत आहे. दरम्यान पूर्व विभागीय सामने 15 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान खेळविले जाणार असून अंतिम सामना 19 डिसेंबरला पश्चिम विभागात खेळविला जाणार आहे.
एएफसी फुटसाल चॅम्पियनशीप स्पर्धा आता एक महिनाअगोदर म्हणजे येत्या डिसेंबर महिन्यात खेळविली जाणार आहे पण एएफसी सॉलिडॅरिटी चषक आणि एएफसी फुटसाल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.