वृत्तसंस्था/ कौलालंपूर
कोरोना महामारी संकटामुळे एएफसी चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेला चांगलाच धक्का बसला आहे. दरम्यान या स्पर्धेतील दोन गटातील सामन्यांचे यजमानपद मलेशिया भूषविणार आहे.
आशियातील या प्रिमियर फुटबॉल स्पर्धेच्या आणखी दोन गटातील सामन्यांचे यजमानपद अद्याप निश्चित झालेले नाही. एएफसी चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेत पश्चिम विभागातील चार गटातील सामन्यांचे यजमानपद कतार भूषविणार आहे. दरम्यान पूर्वविभागातील जी आणि एच गटातील सामने मलेशियात खेळविले जातील. मलेशियात होणाऱया या सामन्यामध्ये जी आणि एच गटातील जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ भाग घेतील. मलेशियातील हे सामने 17 ऑक्टोबरपासून खेळविले जातील तर कतारमधील सामन्यांना 14 सप्टेंबरपासून प्रारंभ होईल.