प्रतिनिधी /म्हापसा
एकतानगर हाऊसिंग बोर्ड म्हापसा येथील श्री साईनाथ मंदिराचे पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करून करण्यात आले.
यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक आशीर्वाद (परेश) खोर्जुवेकर, म्हापसा वाहतूक साहाय्यक संचालक मिनिश तार, मंदिराचे अध्यक्ष संतोष बामणे, उपाध्यक्ष गजानन सुतार, सचिव जयराम (दीपक) नाईक, सहसचिव मुलराज फडते, खजिनदार- अरुण कोरगावकर, उपखजिनदार सत्यवान नाईक, मुखत्यार प्रकाश धुमाळ, सल्लागार विश्वनाथ कळंगुटकर, सदस्य लवू नाईक, मनोहर गवस, शंकर आंबेकर, समीर शिरोडकर, शेखर गावस, प्रताप नाईक तसेच भक्तगण उपस्थित होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी अक्षय तृतीया निमित्त मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाचे दर्शन घेतले. कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष संतोष बामणे यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मुख्यमंत्र्यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण करून 20 वर्षाने पूर्ण झालेल्या मंदिराच्या संपूर्ण कामाचे उद्घाटन करण्यात आले.