प्रतिनिधी/ बेळगाव :
समर्थनगर येथील एकदंत युवक मंडळातर्फे 9 व्या वर्धापनदिनानिमित्त परिसरातील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. एकूण 72 कुटुंबांना हे साहित्य वितरित करण्यात आले.
5 किलो तांदूळ, अर्धा किलो तूरडाळ, तेल, अर्धा किलो साखर, पाव किलो चहा पावडर असे साहित्य कुटुंबांना देण्यात आले आहे. या मंडळाने सामाजिक वसा या लॉकडाऊनच्या काळातही जोपासला आहे. मंडळाने मागील 9 वर्षात युवकांचे संघटन करून अनेक विकासकामे केली आहेत.
यावेळी संतोष कणेरी, नागेश गावडे, अजित पोळ, प्रशांत देवण, नागेश नायक, देशपांडे, बन्सीलाल प्रजापत, विनोद गेहलोत, विजय वर्मा, निर्मल कणेरी, दीपक लंगरकांडे, सुभाष हुचिकट्टी, सुधाकर कडोलकर, विनायक कणेरी, परशराम बेकवाडकर, नंदू वस्त्रद, अशोक खवरे, राम कटारे, संजय पाटील, विजय चौगुले, यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.